वंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 04:44 AM2018-04-19T04:44:46+5:302018-04-19T10:14:46+5:30

वंटास ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याची ही 'वंटास' गोष्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

The trailer of the movie of Vintas, discusses social media | वंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा

वंटास या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा

googlenewsNext
रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या वंटास या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं "टिपूर टिपूर...." हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झाले असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गुरूकृपा प्रॉडक्शन एन्टरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. वंटास ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याची ही 'वंटास' गोष्ट आहे. अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक, मृणालिनी रानावरे, मनमोहन माहिमकर, प्रदीप नवले हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केले आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन जागेश्वर ढोबळे यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून शैलेंद्र पवार यांनी काम पाहिले आहे.
'वेगळ्या पद्धतीने ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा "वंटास" या चित्रपटातून मांडली आहे. चित्रपट निर्मितीचा आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न आणि चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,' असं निर्माता अमोल बापूराव लवटे यांनी सांगितलं. 
सध्या वेगळ्या नावाच्या चित्रपटांचा ट्रेंडच मराठी इंडस्ट्रीमध्ये आला आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या नावाचे चित्रपट प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहेत. वंटास हा देखील एका वेगळ्या नावाचा चित्रपट असल्याने या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटातील अनेक कलाकार हे नवीन असल्याने या चित्रपटातील कलाकारांविषयी देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. वंटास हा शब्द तरुणांमध्ये सहसा वापरला जातो. त्यामुळे या नावामुळे तरुण वर्ग या चित्रपटाकडे आकर्षिला जाईल यात काहीच शंका नाही. 



Also Read : वंटास ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Web Title: The trailer of the movie of Vintas, discusses social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.