Trailer release : आई-मुलाच्या नात्याला स्पर्श करणाºया ‘ध्यानी-मनी’ची पहा झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2017 03:41 PM2017-02-05T15:41:48+5:302017-02-05T21:11:48+5:30
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन आशयाला अधिक महत्त्व देण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न करण्यात येत आहे. असाच काहीसा प्रयोग प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर अभिनीत ‘ध्यानी-मनी’ या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
स ्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन आशयाला अधिक महत्त्व देण्याचा प्रत्येकवेळी प्रयत्न करण्यात येत आहे. असाच काहीसा प्रयोग प्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर अभिनीत ‘ध्यानी-मनी’ या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलिज करण्यात आला असून, हा सिनेमा भावनिक आशयावर आधारित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर आणि चित्रपटातील त्याची पत्नी अश्विनी भावे दिसत आहे. या दाम्पत्यांचा मोहित नावाचा मुलगा अचानक गायब होतो. मोहित आणि त्याची आई यांच्यातील नाते सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आईला आपला मुलगा कशाप्रकारे सर्व काही असतो, हे दाखिवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोहित गायब झाला, की त्याचा मृत्यू झाला याचाच शोध संपूर्ण चित्रपटामध्ये घेतला जातो. हा चित्रपट पूर्णत: भावनिक विषयावर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे बघावयास मिळत आहे.
ट्रेलरमधील दमदारपणा पाहता महेश मांजरेकर यांना दस्तुरखुद्द त्यांचा प्रिय मित्र सलमान खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती अनिरुद्ध देशपांडे आणि मेधा मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटात महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे ही जोडी बºयाच काळानंतर प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट पूर्णत: एका कुटुंबाभोवती फिरतोय. प्रशांत दळवी लिखित या कथानकात मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १० फेब्रुवारी रोजी रिलिज होणार आहे.