मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:38 IST2024-06-06T16:37:31+5:302024-06-06T16:38:26+5:30
'आम्ही जरांगे' सिनेमासाठी मकरंद देेशपांडे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या लूकसाठी किती मेहनत घेतली याची झलक तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल (amhi jarange)

मनोज जरांगेंच्या भूमिकेत असा झाला मकरंद देशपांडेंचा कायापालट, व्हिडीओ व्हायरल
सध्या सगळीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारीत 'आम्ही जरांगे' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा टिझर भेटीला आला. टिझरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत मकरंद देशपांडे यांच्या अभिनयाची झलक बघायला मिळाली. मकरंद देशपांडे यांचा लूक आणि अभिनय पाहून ते हुबेहूब मनोज जरांगे दिसत आहेत. हा लूक कसा तयार करण्यात आला याचा व्हि़डीओ समोर आलाय.
असा बदलला मकरंद देशपांडेंचा लूक
'आम्ही जरांगे' सिनेमाच्य टीमने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बघायला मिळतं की मकरंद देशपांडे मेकअप रुपमध्ये आहेत. त्यांचा लूक बदलण्यासाठी मेकअप आर्टिस्ट आलेले दिसतात. सुरुवातीला मकरंद यांच्या केसांचा झुपका झाकण्यात येतो. पुढे त्यावर विग लावण्यात येते. नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखी दाढी ठेवण्यात येते. या दाढीवर काळा रंग मारण्यात येतो. अशाप्रकारे शेवटी फोटोशूटदरम्यान मकरंद देशपांडे यांचा जरागेंच्या भूमिकेत कायापालट झालेला दिसतो.
'आम्ही जरांगे' सिनेमाविषयी...
नारायणा प्रोडक्शन निर्मिती केलेल्या 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' ह्या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. या सिनेमाच सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील,डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या भन्नाट क्रांतिकारी सिनेमाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. सिनेमाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या सिनेमाेचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत. १४ जून २०२३ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.