​दोन धमाल विनोदी नाटक – चटाटो आणि हाऊसगुल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:14 AM2018-02-27T04:14:28+5:302018-02-27T09:44:32+5:30

एकांकिकांचे एकत्रित प्रयोग मराठी रंगभूमीवर आता होऊ लागले आहेत,त्यात आता भर पडते आहे ती दीर्घांकांच्या एकत्रित प्रयोगाची. संपूर्ण नाट्यकृतीची अनुभूती ...

Two Dhamal Humorous Drama - Chats and Hausgul | ​दोन धमाल विनोदी नाटक – चटाटो आणि हाऊसगुल

​दोन धमाल विनोदी नाटक – चटाटो आणि हाऊसगुल

googlenewsNext
ांकिकांचे एकत्रित प्रयोग मराठी रंगभूमीवर आता होऊ लागले आहेत,त्यात आता भर पडते आहे ती दीर्घांकांच्या एकत्रित प्रयोगाची. संपूर्ण नाट्यकृतीची अनुभूती देऊ शकेल असा दीर्घांक त्याच्या गोळीबंद प्रयोगासह सादर करणे हा उद्देश त्या मागे आहे. निख्खळ विनोद करणे आणि तो सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तशी कठीण गोष्ट आहे,मात्र ही गोष्ट लीलया साध्य करत प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या उद्देश्याने अस्तित्व आणि इम्प्रोव्हायझेशन-मुंबई प्रस्तुत, ३० सेकंड मिडिया हाऊस निर्मित दोन धमाल विनोदी दीर्घांक येत्या बुधवारी २८ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता,दादरच्या शिवाजी मंदिर इथे सादर होणार आहेत.

लेखक विनोद हडप यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली च टा टो अर्थात चटईला टाचणी टोचली हा दीर्घांक दिग्दर्शक प्रमोद शेलार सादर करणार असून विविध स्पर्धांमध्ये या दीर्घांकाने अनेक पारितोषिकांवर मोहर उमटवली आहे. निर्माता संघाच्या दीर्घांक स्पर्धेत लक्षणीय यश मिळवलेल्या विनोद जाधव आणि विशाल कदम लिखित विनोद जाधव दिग्दर्शित हाऊसगुल या दीर्घांकाचे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले असून तो यंदाच्या काळा घोडा महोत्सवात विशेष लोकप्रिय नाट्यप्रयोग ठरला. हेमंत साठे आणि दीपेश मलबारी यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगांची प्रस्तुती दर्जेदार नाट्यकृती सातत्याने प्रेक्षकांसमोर आणणारी ‘अस्तित्व’ ही नाट्यसंस्था करत आहे. हे निख्खळ मनोरंजन करणारे प्रयोग प्रेक्षकांच्या निश्चितच पसंतीस उतरतील असा त्यांना विश्वास आहे.

Web Title: Two Dhamal Humorous Drama - Chats and Hausgul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.