'एक थी बेगम' वेबसिरीजद्वारे सुनिधी चौहान आणि जावेद अली यांची दोन गाणी रसिकांच्या भेटीला !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:41 PM2020-04-20T17:41:19+5:302020-04-20T17:42:31+5:30
‘एक थी बेगम’ ही एक सूड कथा आहे. ज्यात एक सुंदर, धाडसी स्त्री अशरफ भाटकर उर्फ सपना (अनुजा साठे यांनी साकारलेली) च्या आयुष्याची कथा मांडलेली आहे.
भावना व्यक्त करण्याचा आणि त्या पोहोचवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे संगीत. गीत आणि संगीत या दोन्ही गोष्टी हृदयस्पर्शी असतात. भटकंतीच्या वेळी एखादे सुंदर संगीत किंवा रात्री मनोरंजन म्हणून एखाद भन्नाट गीत ऐकावस वाटत. अशाच आशयाच संगीत आघाडीचा मनोरंजन प्रवाह एम एक्स प्लेयर 'एक थी बेगम' सह घेऊन आला आहे. हे संगीत आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तत्कालीन कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनला आव्हान देणाऱ्या धाडसी महिलेच्या आयुष्यावर आधारलेलं आहे. तिचा प्रवास, संघर्ष आणि भावना पुन्हा जिवंत करण्यासाठी 'रब क्यूं खफा' आणि 'चुभती है तन्हाईया' ही दोन्ही गीते सुनिधी चौहान आणि जावेद अली या प्रसिद्ध गायकांनी गायली आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अमितराज यांनी संगीतबद्ध केलेली ही दोन्ही गीते काळजाला भिडणारी आहेत.सुमधुर गायक जावेद अली यांनी गायलेल्या ‘चुभती है तन्हाईया’ या गाण्याबद्दल बोलताना, दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाले की, "चुभती है तन्हाईया’ हे गीत तुमच्या प्रियजनांसोबत असलेल्या आठवणींबद्दल व्यतीत होणारे आहे. हे गाणे प्रेमाची भावना व्यक्त करणारे आहे त्याचबरोबर त्यातील दुःख आणि आव्हाने ही भासवणारे आहे. हे अमितराज यांनी तयार केलेले सुंदर गाणे असून जावेद यांनी खूप छान गायले आहे. ”
‘रब क्यूं खफा’ वर ते पुढे म्हणाले, “या गाण्याबद्दल माझ्या मनाला खरोखर स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे या गाण्यातील शब्द अगदी मनाला मोहून टाकणारे आहेत. हे गाण एकाच वेळी हृदयस्पर्शी त्याचबरोबर दुःख व्यक्त करणार आहे. या गाण्यासाठी मी सुनिधी शिवाय कोणाचाही विचार करू शकलो नसतो कारण तिने या गाण्याला तिच्या गायनातून जिवंत केले आहे." ‘एक थी बेगम’ ही एक सूड कथा आहे. ज्यात एक सुंदर, धाडसी स्त्री अशरफ भाटकर उर्फ सपना (अनुजा साठे यांनी साकारलेली) च्या आयुष्याची कथा मांडलेली आहे. जेव्हा तिचा नवरा झहीर (अंकित मोहन) याच्या मृत्यूसाठी शहरातील सर्वात मोठा डॉन मकसूद (अजय गेही) जबाबदार आहे हे तिला माहित झाले तेव्हा तिचे जीवन बदलले.
सत्य घटनांनी प्रेरित 'एक थी बेगम' एमएक्स प्लेयर ओरिजिनल वेबसिरीज प्रेक्षकांना बेगम अशरफ उर्फ सपनाची कहाणी सांगते जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याचे वचन घेतले होते. या १४ भागांच्या मालिकेमध्ये अनुजा साठे, अंकित मोहन, अजय गेही, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.