​ टिस्काने केली चटणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 04:59 PM2016-11-30T16:59:20+5:302016-11-30T17:00:11+5:30

 बॉलिवूडमधील तसेच मारठी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटविलेली अभिनेत्री टिस्का चोप्रा आता चटणी करणार आहे. जास्त विचारात पडू नका, ...

Tyski Kelly Chutney | ​ टिस्काने केली चटणी

​ टिस्काने केली चटणी

googlenewsNext
 
ॉलिवूडमधील तसेच मारठी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटविलेली अभिनेत्री टिस्का चोप्रा आता चटणी करणार आहे. जास्त विचारात पडू नका, कारण टिस्का कोणाची चटणी करणार नाही तर ती चटणी नावाचा एक लघुपट करीत आहे. टिस्काने नेहमीच हिंदी-मराठी चित्रपटामध्ये वेगळ््या प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. आता पुन्हा ती चटणी या लघुपटातून एका हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे समजतेय. सुजय घोष यांचा अहिल्या, जयदीप सरकार यांचे नयनताराज नेकलेस, अधीराज बोस यांचे इंटिरेअर कॅफे, नीरज पांडे यांचा आऊच या लघुपटांच्या दणदणीत यशानंतर रॉय स्टॅग बँरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स घेऊन आलेत १६ मिनिटांचा लघुपट चटनी. या लघुपटात आदिल हुसैन, तिस्का चोप्रा आणि रसिका दुग्गल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमात भारतीय मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर बेतलेला आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला परदेशी, महागड्या गाड्या बाळगण्याची इच्छा असते. त्यांच्या याच विचारावर हा लघुपट भाष्य करणार आहे. १६ मिनिटांचा हा लघुपट नुकताच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. यात टिस्का सर्वसाधारण दिसणारी एक महिला साकारत आहे. विवाहबाह्य प्रेमप्रकरणावर आधारीत या कथेमध्ये टीस्काच्या नवºयाचे त्यांच्या बाजूला राहणाºया महिलेशी प्रेमसंबंध असतात. या लघुपटाचा शेवट तुम्हाला तोंडात बोटं घालायला भाग पाडेल. या लघुपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत असल्याचे समजत आहे. टिस्काला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक असल्याने बºयाचजणांनी हा लघुपट पाहीला आहे.

Web Title: Tyski Kelly Chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.