उदय टिकेकर म्हणतायेत, मालिका आणि सिनेमा दोन्ही समान !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 03:17 PM2016-11-25T15:17:35+5:302016-12-05T11:18:30+5:30
बेनझीर जमादार ‘जुळून येतील रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनेता उदय टिकेकर यांची बाबाजीची भूमिका फारच गाजली होती. ...
बेनझीर जमादार
‘जुळून येतील रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनेता उदय टिकेकर यांची बाबाजीची भूमिका फारच गाजली होती. प्रेक्षकांचे हे लाडके बाबाजी आता बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरूख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर ‘मनमर्जि़या’ या मराठी चित्रपटातदेखील ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याच प्रवासाविषयी लोकमत सीएनएक्सशी त्यांनी मारलेल्या मनमोकळया गप्पा.
१. ‘रईस’ या चित्रपटाविषयी काय सांगाल?
- माझ्यासाठी हा खूप मोठा व महत्त्वाचा चित्रपट आहे. यापूर्वीदेखील मी अजय देवगन, जॉन अब्राहम यांच्यासोबत काम केले आहे. मात्र हा अनुभव माझ्यासाठी खरचं खूप खास आहे. सध्याची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता या चित्रपटाविषयी मला फार काही बोलता येणार नाही. पण हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
२. बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- ‘किंगखान’सोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. हे स्टार्स सेटवर आलेत की, आपला स्टारडम व्हॅनिटी व्हॅनमध्येच सोडून येतात. सेटवर अगदी नवोदित कलाकारासारखे असतात. दिग्दर्शक आणि सहकलाकारांच्या नियमांचे पालनदेखील करतात. अगदी सेटवर विद्यार्थी असल्यासारखे राहतात. शाहरूखबद्दल बोलायचे तर तो नेहमी नवीन शिकण्यास उत्सूक असतो. मेहनत घेण्याची त्याची तयारी असते. त्याला सेटवर पाहिल्यावर मी माझ्या कॉलेजच्या आठवणीत रमून जायचो. कारण प्रत्येक शॉर्ट तो प्रचंड उत्साहाने करायचा.
३. मालिका आणि चित्रपट यात काय फरक जाणवला?
- मला व्यक्तिश: मालिका आणि चित्रपट यात फार फरक जाणवत नाही. अर्थात चित्रपटांच्या तुलनेत मालिकांमध्ये अधिक पैसा व प्रसिद्धी आहे. दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. चित्रिकरण करण्याची पद्धत वेगळी आहे. पण मालिकांमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचता येते. असे असले तरी मला मात्र मालिका आणि चित्रपट दोन्हींते काम करायला आवडेल.
४. तुमची ‘जुळून येतील रेशीमगाठी’ या मालिकेतील बाबाजीची भूमिका फारच गाजली होती याविषयी काय सांगाल?
- हो, खरं बाबाजी या भूमिकेचे संपूर्ण श्रेय मी या मालिकेचे दिग्दर्शक हेमंत देवधर यांना देईन. बाबाजी कसा दिसतो, चालतो, कपडे, अंगठया, कपाळाचा टिक्का या सर्व गोष्टींच्यामागे हेमंतचा हात आहे. मी फक्त ती भूमिका रंगविण्याचे काम केले. या भूमिकेसाठी त्याने मला थोडी सूट दिली होती. मी मात्र त्यानंतर इतका सुटलो की, प्रेक्षकदेखील आज मला पाहिल्यानंतर आधी बाबाजी बाबाजी करतात.
५. तुमच्या करिअरमधील आवडती भूमिका कोणती? त्याचबरोबर भविष्यात तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडेल?
- माझ्या करिअरमध्ये मला ‘अग्निहोत्री’ मालिकेतील भूमिका फार आवडली. आतापर्यत नशीबाने व देवाच्या कृपेने वेगवेगळया भूमिका करण्याची संधी मला मिळाली. आयुष्यात ज्या भूमिका केल्यात, त्याच भूमिका करण्याची माझी इच्छा होती. माझी ती इच्छा पूर्ण झाली, याचा आनंद आहे.
६. सध्या तुम्ही ‘मनमर्जिया’च्या चित्रिकरणात व्यस्त आहात, त्याविषयी काय सांगाल?
- हो, मनमर्जिया हा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच तरूण आहे. या यंग टीमसोबत काम करण्याचा अनुभव खरचं खूप मस्त आहे. ही मुले अप्रतिम काम करतात. आतापर्यत अशा युनिटसोबत कधीच काम केले नव्हते.
७. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून स्वानंदीदेखील अभिनय क्षेत्राकडे वळली आहे. त्यामुळे तिला कशा पध्दतीने मार्गदर्शन करता?
- हल्ली काय झाल आपण मुलांकडून मार्गदर्शन घ्यायचं असतं. मात्र स्वानंदी ही फार गुणी मुलगी आहे. मी, आरती आणि स्वानंदी एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे चर्चा करून एकमेकांचे सल्ले घेत असतो. स्वानंदीदेखील अनेकदा विचारते . तेव्हा आमचा पस्तीस वषार्चा अनभुव आहे, तोच आम्ही तिच्यासमोर ठेवतो. तसेही एक वडील म्हणून माझ्या शुभेच्छा नेहमीच तिच्यासोबत असणार आहेत.