'इतक्या' लाखांची आहे उमेश कामतची नवीन ड्रीम बाईक, आकडा वाचून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:52 IST2025-01-08T14:49:15+5:302025-01-08T14:52:40+5:30

उमेश कामतने नवीन महागडी बाईक घेतली आहे. 

Umesh Kamat Buys New Dream Bike Triumph Scrambler 400 Bike Know The Price | 'इतक्या' लाखांची आहे उमेश कामतची नवीन ड्रीम बाईक, आकडा वाचून...

'इतक्या' लाखांची आहे उमेश कामतची नवीन ड्रीम बाईक, आकडा वाचून...

Umesh Kamat New Bike: मराठी फिल्म इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे उमेश कामतश(Umesh Kamat). गेली २ दशकापासून तो मराठी फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. उमेश हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयासोबत त्याला  मला बाईक रायडिंगचीही खूप आवड आहे. तो अनेकदा बाईक चालवताना दिसला आहे. बाईकहून जगाची भ्रमंती करण्याची अनेक रायडर्सची इच्छा असते. हीच इच्छा तो मनी बाळगून होता. अलीकडे उमेश कामतने नवीन महागडी बाईक घेतली आहे. 

उमेशनं बाईक खरेदी करताच तिच्या किंमतीची देखील चर्चा सुरू आहे. उमेशनं Triumph Scrambler ४०० ही बाइक विकत घेतली आहे.  या बाईकची किंमत ३ ते ४ लाखांच्या जवळपास आहे. जबरदस्त रायडिंगचा अनुभव देणारी ही दुचाकी आहे. लांबचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी बाइकच्या सीटवर जाड फोम जोडण्यात आला आहे. या बाईकला अनेक फीचर्ससह शानदार लुक देण्यात आला आहे.


उमेश आता आपल्या नव्याकोऱ्या बाईकवरून भटकंती करायला सज्ज झालाय. कोकणपासून सुरुवात करुन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचा, असं उमेशनं ठरवलं आहे. तसेच पत्नी प्रियालाही आपल्या गाडीवरुन तो मनमुराद फिरवणार आहे.  उमेश आणि प्रिया बापट हे कलाविश्वातील फेमस कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि चाहत्यांना आयुष्यातील अपडेट देत असतात. 
 

Web Title: Umesh Kamat Buys New Dream Bike Triumph Scrambler 400 Bike Know The Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.