सर्सामान्य माणसाची असामान्य कथा “ थेंक यु विठ्ठला”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 07:01 AM2017-11-01T07:01:18+5:302017-11-01T12:31:18+5:30
मुंबईत डबेवाल्यांच स्थान अनन्यासाधारण आहे. असाच एक डबेवाला “हरी” इमानेइतबारे काम करत आपली बायको रखमा आणि मुलगा विठू यांच्यासोबत ...
>मुंबईत डबेवाल्यांच स्थान अनन्यासाधारण आहे. असाच एक डबेवाला “हरी” इमानेइतबारे काम करत आपली बायको रखमा आणि मुलगा विठू यांच्यासोबत आपला संसार करत आहे. हरी ह्या काटकसरीच्या जीवनाला वैतागला आहे. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात जे मिळत त्याहुन अधिक चांगलं नेहेमी दुसऱ्याला मिळत असं वाटत असत. हरीलाही नेमक तेच वाटत आहे. ह्यातून त्याचा विठ्ठलाशी सततचा झगडा आहे. जेव्हा साक्षात विठ्ठल हरीच्या समोर उभा राहतो आणि त्यानंतर हरी आणि त्याच्या आयुष्यात होत जाणारे बदल हे ह्या चित्रपटाची जान आहेत. सुंदर पटकथा आणि सुंदर गाण्यांनी हा चित्रपट नक्की मनोरंजन करणारा असेल अशी खात्री देणारा ठरलाय. कथा आणि दिग्दर्शन देवद्रेंशिवाजी जाधव यांनी अतिशय कल्पकतेने आणि नमकेपणाने केले आहे.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसुम तोंडवळकर, प्रदीप पटावर्धन, स्मिता शेवाळे, पूर्वी भावे, तेजा देवकर, मनीषा राऊत, सुनीता गोडबोले, जयवंत वाडकर, वरद सरम्बेळकर आदी कलाकारांनी ह्या सिनेमाला भक्कम आधार दिलाय.
ह्या सिनेमाची निर्मिती एम जी के प्रो़डक्शन तर्फे श्री. गोवर्धन काळे, गौरव गोवर्धन काळे आणि अंजली सिंग यांनी अतिशय उत्तम निर्मितीमूल्ये सांभाळत केली आहे. प्रसिद्ध लेखक एम. सलीम यांनी पटकथा आणि सहनिर्मितीची जबाबदारी संभाळली आहे. योगेश शिरसाट आणि एम. सलीम ह्यांनी खुसखुशीत संवाद लेखन केले आहे. उत्कृष्ट छायचित्रण ही ह्या चित्रपटाची जमेची बाजू छायचित्रकार दिनेश सिंग ह्यांनी सांभाळली आहे. गीतकार ही मच्छिंद्र मोरे, विजय शिंदे आणि दीपक कांबळी ह्यांच्या गीतांनी नुकत्याचं ''बाबा'' ह्या गीताने गाजत असलेले 'व्हेनटीलेटर' चित्रपटाचे संगीतकार रोहन रोहन ह्यांनी साज चढवला आहे. तर नृत्य ही गणेश आचार्य ह्यांच्यासारख्या मातब्बर नृत्यदिग्दर्शकाने आलेखीत केली आहेत. हा चित्रपट वेगवान आणि पकड घेणार झाला आहे तो संकलक अजय चव्हाण ह्यांच्या कौशल्यामुळे. अरविंद हातनुरकर या तरुण कलाकाराने व्ही एफ एक्स हे अतिशय सुरेख केले आहेत.