अविस्मरणीय आठवणींना ‘हॉस्टेल डेज’मधून उजाळा! - अजय नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 01:04 PM2018-01-10T13:04:57+5:302018-01-10T18:34:57+5:30

अबोली कुलकर्णी प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी ‘बावरे प्रेम हे’, ‘लग्न पाहावे करून’ आणि ‘सतरंगी ...

Unforgettable memories are 'Hostile Days'! Ajay Naik | अविस्मरणीय आठवणींना ‘हॉस्टेल डेज’मधून उजाळा! - अजय नाईक

अविस्मरणीय आठवणींना ‘हॉस्टेल डेज’मधून उजाळा! - अजय नाईक

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी ‘बावरे प्रेम हे’, ‘लग्न पाहावे करून’ आणि ‘सतरंगी रे’ यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या मुख्य भूमिकेतील हा चित्रपट १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी दिग्दर्शक अजय नाईक यांच्याशी मारलेल्या या गप्पा...

* ‘हॉस्टेल डेज’ या मराठी चित्रपटाविषयी काय सांगाल?
- खरं सांगायचं तर, ही कथा आहे १९९४ मधील साताऱ्याच्या कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची आहे. १९९०च्या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येवू लागले. समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. ‘हॉस्टेल डेज’ची कथा हेच बदल अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने, विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते. १९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन,शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.

* चित्रपटाचे लेखन, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शक म्हणून तुम्ही कामगिरी पाहिली. काय सांगाल आत्तापर्यंतच्या एकंदरित प्रवासाविषयी?
- सर्वप्रथम मी एक संगीतकार आहे. आणि मला असं वाटतं की, एका संगीतकारामध्ये साहजिकच लेखकही दडलेला असतोच. त्याशिवाय दिग्दर्शनामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. नवनवीन कलाकारांसह, मोठ्या गायक मंडळीसोबत काम करता आले. 

* प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा? चित्रपटाचे विशेष काय सांगता येईल?
- प्रत्येकाने केव्हा ना केव्हा हॉस्टेल लाईफ एन्जॉय केलेली असते. खरंतर हे दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुगंधी क्षण असतात. त्या आठवणींना उजाळा द्यायला आपल्याला कायम आवडते. ही कथा आकाराला आली त्या १९९०च्या दशकांत मोबाईल फोन नव्हते, स्मार्ट फोन नव्हते, केबल टीव्ही नव्हता की डिश टीव्ही नव्हता. इंटरनेट तर नव्हता. त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती. हॉस्टेलमधील आयुष्य त्यावेळी आता आहे त्याच्या कितीतरी पटीने अधिक आकर्षक होते. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळेच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना येईल. व्हॉटस अ‍ॅप किंवा सोशल मीडियामुळे जे क्षण अनुभवणं विसरतो ते यानिमित्ताने जगायला मिळतील.

* तुमच्या हॉस्टेलच्या दिवसांतील काही आठवणी शेअर कराल?
- खरं सांगायचं तर, मी कधीही हॉस्टेलमध्ये राहू शकलो नाही. त्याची मला अर्थातच खंत आहे. पण, काय असतं ना, तुम्ही हॉस्टेलमध्ये कायमचे जरी राहत नसलात तरीही तुम्ही त्याचा भाग नक्कीच असता. माझ्याबाबतीतही तसंच झालं. मी कायम मित्रांसोबत हॉस्टेलवरच असायचो. ते दिवसच काही और होते. मित्रांसोबत गप्पाटप्पा, मजामस्ती, धम्माल आणि बरंच काही आम्ही करायचो. मला असं वाटतं, आयुष्यात प्रत्येकाने या दिवसांचा नक्कीच अनुभव घ्यावा.

* ‘हॉस्टेल डेज’ नंतर पुढे काय? भविष्यातील प्रोजेक्टविषयी काही सांगा?
- ‘हॉस्टेल डेज’चा दुसरा भाग लिहून तयार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची मला उत्सुकता आहे. चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 

Web Title: Unforgettable memories are 'Hostile Days'! Ajay Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.