अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याचे फोटो पाहिलेत का ?, जाणून घ्या तिच्या पतीविषयीच्या या खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 14:05 IST2021-12-18T14:03:23+5:302021-12-18T14:05:05+5:30
मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या नवऱ्याचे फोटो पाहिलेत का ?, जाणून घ्या तिच्या पतीविषयीच्या या खास गोष्टी
मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत असते. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील काही घटना, प्रसंग चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनालीने अलीकडेच पती कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सोनालीची नवऱ्यासोबतची केमिस्ट्री दिसतेय. नवऱ्यासोबत फोटोशूट करतानाचा आनंद सोनालीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. यातील एक फोटो कोरियोग्राफर फुलवा खामकरही दिसते आहे. माझ्या आवडत्या लोकांसह असे फोटो कॅप्शन सोनालीने फोटोला दिले आहे.
मे महिन्यात सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बंधली. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत राहतो. कुणालचं शिक्षणही लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं आहे.त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण देखील घेतलं.
सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत..