आगामी‘इपितर’ सिनेमाचा पोस्टर लाँच,या तराखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 06:33 AM2018-05-05T06:33:08+5:302018-05-05T12:03:08+5:30

साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा ...

The upcoming 'Ethereal' poster launch of the movie will be displayed in this archive | आगामी‘इपितर’ सिनेमाचा पोस्टर लाँच,या तराखेला होणार प्रदर्शित

आगामी‘इपितर’ सिनेमाचा पोस्टर लाँच,या तराखेला होणार प्रदर्शित

googlenewsNext
धी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे 'इपितर'.'इपितर' सिनेमाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत 'इपितर' सिनेमाची निर्मिती नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे.या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे ,निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड सिनेमाविषयी सांगतात, “इपितर हा टिपीकल गावाकडला शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो. अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हांला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केलेला आहे.” 


छोट्या छोट्या गावांमध्ये राहत असली तरी तेथे राहणा-या मुलांची स्वप्नं मोठी असतात.जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. अंगी कला असली, की मग ती कला व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही.जातिवंत कलाकार कोणत्याही साधनेतून कला सिद्ध करून दाखवतोच मग त्याला कितीही अडचणी असल्या तरीसुध्दा ती कला उभी करतोच. असच एक उदाहरण ठरलंय सिनेमाचा दिग्दर्शक किरण बेरड. किरणचेही सिनेमा बनवण्याचे स्वप्न होते.अहमदनगर जिल्ह्याच्या सोनेवाडी राहणाऱ्या या किरण बेरडचं एक छोटसं किराणामालाचं दुकान आहे.जिद्दीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करु शकतो असं म्हटलं जातं आणि हेच किरणने दाखवून दिलं आहे.किरणने सिनेमासाठी एक कथा लिहिली. त्यानंतर ती कथा रुपेरी पडद्यावर साकारण्याचं धाडस ग्रामीण भागातील या जिद्दी तरुणाने केलं.'इपीतर' नावाच्या  या  सिनेमाचं चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यात करण्यात असून केवळ ३६ दिवसांमध्ये ते पूर्ण झाले आहे. अखेर किरणचं स्वप्न या सिनेमाच्या निमित्ताने पूर्णत्वास येत आहे. डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत, नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड निर्मित आणि दत्ता तारडे दिग्दर्शित इपितर 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.

 


Web Title: The upcoming 'Ethereal' poster launch of the movie will be displayed in this archive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.