Reel & Real एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये; फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 14:34 IST2023-08-27T14:33:13+5:302023-08-27T14:34:05+5:30
Kshitish Date: 'धर्मवीर' या सिनेमामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती.

Reel & Real एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये; फोटो होतोय व्हायरल
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यानंतर लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग 'धर्मवीर २'(Dharmaveer 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत येत असून अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'धर्मवीर' या सिनेमामध्ये क्षितीश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका क्षितीशने अत्यंत सुंदररित्या वठल्यामुळे त्याचं सर्व स्तरांमधून कौतुक झालं होतं. इतकंच नाही तर त्याचा लूकदेखील हुबेहूब एकनाथ शिंदे यांच्यासारखाच असल्यामुळे अनेकांनी त्याला दाद दिली होती. यामध्येच आता रिल आणि रिअल लाइफमधील एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत. क्षितीशने त्याच्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
'On 2 it', असं कॅप्शन देत क्षितीशने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'धर्मवीर 2' सिनेमाची टीम दिसून येत आहे. यात अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे 9pravin tarde) आणि रमेश परदेशी (Ramesh Pardeshi ) देखील दिसून येत आहेत.
दरम्यान, धर्मवीरच्या यशानंतर 'धर्मवीर २'ची चर्चा सुरू झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती. तसंच धर्मवीर २ चं लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडेच करणार आहेत. अलिकडेच या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.