उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:51 IST2020-02-11T15:49:46+5:302020-02-11T15:51:12+5:30
Ekda Kay Zale Movie : उर्मिला कानिटकर-कोठारे लवकरच मराठी चित्रपटातून कमबॅक करते आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे मुलगी जिजाच्या जन्मापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र ती जाहिरातीमध्ये झळकताना दिसली. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्मिला लवकरच मराठी चित्रपटातून कमबॅक करते आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.
सध्या अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेएकदा काय झालं या चित्रपटाचं शूटिंग करते आहे. तिने या सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
एकदा काय झालं या चित्रपटात उर्मिलासोबत सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे हे कलाकार दिसणार आहेत. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि सौमेंदु कुबेर यांच्या शो बॉक्स एंटरटेन्मेंटतर्फे आणि अरुंधती दात्ये, अनुप निमकर, सलील कुलकर्णी आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या गजवदन प्रॉडक्शन्स तर्फे होत आहे.
पहिल्या सिनेमाप्रमाणेच सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’ मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे.