Birthday Special : उर्मिला कानेटकर कोठारेच्या आई आहेत ख्यातनाम वकील, पाहा तिच्या कुटुंबियांचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:40 IST2021-05-04T11:39:09+5:302021-05-04T11:40:08+5:30
उर्मिला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अनेकवेळा तिच्या आई वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.

Birthday Special : उर्मिला कानेटकर कोठारेच्या आई आहेत ख्यातनाम वकील, पाहा तिच्या कुटुंबियांचे फोटो
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. उर्मिलाचा आज वाढदिवस असून ती लवकरच एकदा काय झालं या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे. उर्मिलाच्या मुलीच्या जन्मानंतर तिने अभिनयक्षेत्रातून काही काळाचा ब्रेक घेतला होता. पण तिच्या कमबॅकमुळे तिचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.
उर्मिलाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे सोबत झाले असून त्यांना जिजा ही मुलगी आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची ही जोडी खूपच आवडते. उर्मिला ही प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांची सून आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, उर्मिलाच्या आई या एक प्रसिद्ध वकील आहेत. उर्मिलाची आई नीलिमा कोठारे या प्रसिद्ध वकील असून त्या महिला सबलीकरणासाठी काम करतात.
उर्मिला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अनेकवेळा तिच्या आई वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत असते. उर्मिलाने खूपच कमी वयापासून नृत्य शिकायला सुरुवात केली असून ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली नर्तिका आहे.