​ आदिनाथचे उर्मिलाला स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2016 12:55 PM2016-12-20T12:55:13+5:302016-12-20T12:56:44+5:30

आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल आहे. या दोघांनीही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आज हे ...

Urmila special tribute from Adinath | ​ आदिनाथचे उर्मिलाला स्पेशल गिफ्ट

​ आदिनाथचे उर्मिलाला स्पेशल गिफ्ट

googlenewsNext
िनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल आहे. या दोघांनीही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आज हे दोघेही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहेत. आता वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना सरप्राईज दयायचे, काहीतरी मस्त गिफ्ट दयायाचे आणि तो दिवस कायमचा अविस्मरणीय करायचा असे तर सर्वांनाच वाटते ना. मग आदिनाथ तरी कसा काय मागे राहणार बरं, आदिनाथने थेट त्याच्या बायकोसाठी सोशल साईट्सवरच एका सुंदर कवितेतून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. उर्मिला कशी आहे हे त्याने त्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता वाचताना अतिशय हळवी आणि भावनिक वाटते. मनाला नक्कीच स्पर्ष करुन जाते. फारच कमी जणांना हे माहित असेल की आदिनाथ कविता करतो. त्याला कविता करायला फार आवडतात. अनेकदा तो मनात आलेल्या भावनांना शब्दांच्या रुपात वाट मोकळी करुन देतो. आता त्याने सोशल साईट्सवर शेअर केलेली ही झक्कास कविता स्वत: केली आहे का हे मात्र समजलले नीही. परंतू उर्मिलासाठी त्याने अगदी जगजाहीर असा प्रेमाचा इजहार केला आहे, यापेक्षा दुसरे भारी गिफ्ट उर्मिलासाठी काय असणार. तर उर्मिलाने देखील आदिनाथला सोशल साईट्सवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्मिलाने आदिनाथ सोबतचे एकदम हटके फोटो सोशल साईट्सवर शेअर केले आहेत. आदिनाथ आणि उर्मिलाने काही चित्रपट एकत्र केले होते. आता मात्र बºयाच दिवसांपासून ही जोडी काही एकत्र मोठ्या पडदयावर दिसलेली नाही. त्यामुळे लवकरच हे दोघेही त्यांच्या चाहत्यांना चित्रपटात एकत्र दिसतील अशी आपण आशा करुयात. लग्नाचा हा वाढदिवस उर्मिला आणि आदिनाथ नक्कीच लय भारी साजरा करतील. या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी खुप साºया शुभेच्छा 

Web Title: Urmila special tribute from Adinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.