​ उर्मिला- झाकीर हुसैन यांचा फ्रेन्डफी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 12:27 PM2016-12-02T12:27:15+5:302016-12-02T12:27:15+5:30

 सेल्फी काढण्याची क्रेझ तर सगळ््यांनाच असते. काही झाले तरी लगेचच फोन काढून सेल्फी घेण्याचा मोह खरतर कोणालाच आवरता येत ...

Urmila- Zakir Hussain's French Profile | ​ उर्मिला- झाकीर हुसैन यांचा फ्रेन्डफी

​ उर्मिला- झाकीर हुसैन यांचा फ्रेन्डफी

googlenewsNext
 
ेल्फी काढण्याची क्रेझ तर सगळ््यांनाच असते. काही झाले तरी लगेचच फोन काढून सेल्फी घेण्याचा मोह खरतर कोणालाच आवरता येत नाही. परंतू तुम्ही कधी फ्रेन्डफी ऐकलाय का. होय आता सेल्फी नाही तर फ्रेन्डफीची क्रेझ पाहायला मिळणार आहे. आपली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेने नुकताच हा फ्रेन्डफी काढला आहे. आणि तो देखील दस्तुरखुद्द तबला वादक झाकीर हुसैन यांच्या सोबत. पण तुम्हाला अजुनही प्रश्न पडलाय ना, की हा फ्रेन्डफी म्हणजे नक्की आहे तरी काय? फ्रेन्डफी म्हणजे फ्रेन्ड्स सोबत काढलेला सेल्फी. आता तुम्ही म्हणाल की उर्मिला आणि झाकीरजी फ्रेन्ड्स आहेत का, तर याचे उत्तर आपण उर्मिला कडुनच जाणून घेऊयात. या झक्कास फ्रेन्डफी बद्दल उर्मिला सांगतेय, मी माझ्या बिल्डींगखाली उभी होते. नुकतीच मी जिम वरुन आले होते, आणि वर जात असताना पाहते तर काय माझ्या समोर झाकीर हुसैन होते. ते एकटेच वर जात होते. मी त्यांना पाहिले आणि मला खरच त्यांना पाहून फार आनंद झाला. मी त्यांना फोटो काढण्याविषयी विचारले. ते थांबले आणि त्यांनी लगेचच फोटो काढण्यास होकार दिला. पण ते म्हणाले हम सेल्फी नही फ्रेन्डफी लेते है... त्यांच्या सोबत काढलेला हा फोटो माझ्यासाठी खरच अविस्मरणीय आहे. ते बोलायला देखील खुप छान आहेत. एवढेच नाही तर त्यांनी माझ्या या फोटोला रिटष्ट्वीट देखील केले आहे. उर्मिला तुला भेटून खुप छान वाटले असे रिटवीट त्यांनी केले आहे. क्या बार है उर्मिला... तुम्हारा तो दिन ही बन गया.

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Urmila- Zakir Hussain's French Profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.