'माझा वापर करून घेतला आणि...', नवरा प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या 'त्या' रिलवर संतापली मानसी नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:02 IST2022-12-21T14:01:07+5:302022-12-21T14:02:10+5:30
Manasi Naik And Pardeep Kharera : मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'माझा वापर करून घेतला आणि...', नवरा प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या 'त्या' रिलवर संतापली मानसी नाईक
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) आणि प्रदीप खरेरा (Pradip kharera) यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला अभिनेत्रीनं दुजोरा देत पूर्णविराम लावला. केवळ आणि केवळ प्रसिद्धी आणि पैसा मिळण्यासाठीच त्याने माझ्यासोबत लग्न केले होते, असा धक्कादायक खुलासा तिने केला होता. प्रदीप सोबत लग्न करण्याचा माझा निर्णय पूर्णपणे चुकला असल्याची जाणीव तिला झाली. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते या संकटातून मला बाहेर काढतील असा विश्वास मानसीला आहे. मानसीने या धक्क्यातून स्वतःला सावरत आता आपले सर्व लक्ष करिअरकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीप रडताना दिसलेला पाहून तिने आता त्याच्या ढोंगीपणाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रदीप खरेरासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसला. मीडियाशी मनमोकळेपणाने न बोलताना त्याने आपल्या इंस्टाग्रामवरून रिलच्या माध्यमातून आपण किती खचलो आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. या रिलमध्ये तो रडताना देखील पाहायला मिळाला. त्यावरून प्रदीप मानसीपासून विभक्त झाल्यानंतर पूर्णपणे खचला आहे असे भासवतो आहे तर मानसी किती चुकीची वागली हेही तो या रीलमधून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. त्याच्या या रिलमधून त्याचा ढोंगीपणा उघड होतो आहे, असे मानसीचे म्हणणे आहे.
प्रदीपने काही सोशल मीडियावर स्टार बनलेल्या तरुणींसोबत रील बनवले होते. हे पाहून मानसी पोस्टमध्ये म्हणाली की, अरे कच्ची कलियां मिल गई एक नहीं बल्की दो दो…और रोने के अॅक्टिंग के ५० रुपये काटे जाए… बंदा पार्टी करता है और रील में रोता है…फेक लव्ह, सहानुभूती, मै ही दे देती फुकट में, जैसे खाया यूज किया फुकट में …Karma Will Talk
मानसीची ही सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे. माझा वापर करून घेतलास आणि आता रीलमध्ये रडून तो लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे रडतानाचे व्हिडीओ आणि त्याच बाजूला तरुणींसोबत व्हिडीओ बनवून तो खऱ्या आयुष्यात कसा आहे याचा उलगडाच तो यातून करतो आहे. तुझं कर्म तुला योग्य धडा शिकवेल असे मानसी तिच्या या पोस्टमध्ये म्हणताना दिसते आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या म्हणण्यावर सहानुभूती दर्शवली आहे.