'आकाशाला गवसणी घातलेला...’, उत्कर्ष शिंदेकडून जितेंद्र जोशीचं भरभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 06:02 PM2023-12-14T18:02:24+5:302023-12-14T18:16:20+5:30

उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.

utkarsh shinde special post for actor Jitendra Joshi | 'आकाशाला गवसणी घातलेला...’, उत्कर्ष शिंदेकडून जितेंद्र जोशीचं भरभरुन कौतुक

'आकाशाला गवसणी घातलेला...’, उत्कर्ष शिंदेकडून जितेंद्र जोशीचं भरभरुन कौतुक


संगीताच्या क्षेत्रात प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांनी आपल्या गायन कौशल्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा डॉक्टर होऊनही संगीताचा वारसा पुढे नेतो आहे.  सोशल मीडियावर तो प्रचंड सक्रिय असतो. यातच उत्कर्ष शिंदेने मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीबद्दल खास पोस्ट करत त्याचे भरभरुन कौतुक केले आहे. 

 उत्कर्षने पोस्टमध्ये लिहले, 'मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व... निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो, असे माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest”अस सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील, असे त्यांनी मांडले. माझ्या आयुषात ही असाच एक चार्ल्स डार्विन आहे'.

पुढे तो म्हणतो, 'गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती.”द जिंतेंद्र जोशी” “मराठीची समज,संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता, रोकठोक व्यक्तीमत्व...आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती मग सेक्रिड गेम्स सो किंवा, नुकताच आलेला गोदावरी,नाळ २ असो. मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून गीतातून, कवितांमधून वेगळ काही तरी देणारा अवलिया. माझ्यासाठी कलाविश्वात गुरु स्थानी असलेला कलाकार,व्यक्तीमत्व म्हणजे 'द जितेंद्र जोशी'. नेहमी भेटल्यावर मोठ्या भावा प्रमाणे आधी काळजीपोटी .माझ्या खांद्याच्या झालेल्या दुःखापदेची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही तर स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करुन घेणारा. उत्कर्ष तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस. खूप काम कर कामात मज्जा-आनंद घे'. 

 उत्कर्ष म्हणतो, 'जस चार्ल्स डार्विन सजीवांबद्दल सांगतात. जगण्याच्या ह्या स्पर्धेत जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो. तोच जीव तग-धरून राहतो. आणि तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. असाच काही मला नेहमी नकळतपणे गप्पा मारत मार्गदर्शन करणारा'.

'मराठी सिनेमाची दिशा समजाऊन सांगणारा. कॉम्पटीशन स्ट्रगल हार्डवर्क बद्दल मार्गदर्शन करणारा. प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदल सतर्कता ठेव सांगणारा. अभिनय क्षेत्रात दिशा, कन्सिस्टन्सी (नियमितपणा), ह्याचं महत्व सांगत संस्कार करणारा. सुतार पक्ष्याच उदाहरण देत “लगे रेहनेका भाई बाकी सब हो जाता है” म्हणजेच सगळं विसरून कामात झोकून द्यायचं. मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस,असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ .माझा चार्ल्स डार्विन “जितू दादा”', या शब्दात  उत्कर्षने जितेंद्र जोशीचे कौतुक केले. 

Web Title: utkarsh shinde special post for actor Jitendra Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.