वैदेही परशुरामीनं साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस, सर्वत्र होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:16 IST2024-11-19T16:15:21+5:302024-11-19T16:16:00+5:30
लाडक्या आजीचा वाढदिवस अभिनेत्री वैदही परशुरामीनं साजरा केला आहे.

वैदेही परशुरामीनं साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस, सर्वत्र होतंय कौतुक
आजी म्हणजे काय तर दूधावरची साय..... आजी आजोबांमुळे प्रत्येकाचं बालपण अगदी लाडाकोडात जातं. आईवडीलांचा ओरडा किंवा मार खाण्यापासून वाचवण्यासाठी आजीचा पदर हा कायम ठरलेला असतो. तिच्या मायेचा एक हात मनाला शांत करण्यास पुरेसा असतो. अशा लाडक्या आजीचा वाढदिवस अभिनेत्री वैदही परशुरामीनं साजरा केला आहे.
वैदहीने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. वैदही या व्हिडीओमध्ये आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओत आजीला हाताला धरून ती केक कापताना दिसून येत आहे. आजीसोबतचे सुंदर क्षण तिने या व्हिडीओमधून शेअर केले आहेत. यात वैदही आणि तिच्या आजीचं सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला तिने "आजी! #aaji #mystrength #happybirthday #tothestrongestladyiknow", असं कॅप्शन दिलं आहे.
वैदहीचा हा साधेपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावला आहे. या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. वैदेही परशुरामीला मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. वैदही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.