'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:05 PM2024-10-15T12:05:54+5:302024-10-15T12:06:33+5:30

वंदना गुप्तेंनी अतुल परचुरेंना वाहिली आदरांजली

Vandana Gupte shared a photo with Atul Parchure says huge loss of rangabhumi | 'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता अतुल परचुरेंनी (Atul Parchure) अकाली एक्झिट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मनोरंजनविश्वातून त्यांच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. जुन्या कलाकारांसह नवीन कलाकारही भावुक झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) सोशल मीडियावरअतुल परचुरेंसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त झाल्या आहेत.

हसलरा चेहरा, उत्तम आरोग्य असेच अतुल परचुरे आजही डोळ्यासमोर येतात. त्यांच्यासोबतचा असाच एक गोड फोटो वंदना गुप्तेंनी शेअर केला आहे. दोघांनी यामध्ये विशिष्ट कॉस्च्युम घातले आहेत. तसंच त्यांचा खेळकर अंदाज बघायला मिळत आहे. तर दुसरा फोटो ज्यामध्ये इतर मराठी कलाकारही आहेत. वंदना गुप्ते लिहितात, "माझा प्रिय मित्र, उत्कृष्ट अभिनेता, सहकलाकार अतुल परचुरे आपल्यात नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. स्वच्छ शब्दोच्चार, शुद्ध भाषा, अतिशय सहज आणि प्रवाही अभिनय, तालबद्ध शब्द फेक ही त्याची खासियत. चविष्ट खाण्याची आवड आणि नाटकावर मनापासून प्रेम करणारा सहकलाकार मित्र . अतुलच्या जाण्यानी रंगभूमीचं फार मोठं नुकसान झालंय.
अतुल तुला आदरांजली."


वंदना गुप्तेंनी आपल्या प्रिय मित्राला या शब्दात आदरांजली वाहिली आहे. हे फोटो आणि हे कॅप्शन आपसूकच डोळ्यात पाणी आणणारं आहे. सर्वांना हसवणारा अभिनेता अचानक रडवून निघून जातो यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीए. कलाविश्वासह राजकीय विश्वातूनही त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

Web Title: Vandana Gupte shared a photo with Atul Parchure says huge loss of rangabhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.