वरद चव्हाण झळकणार करार प्रेमाचा या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 09:42 AM2017-10-13T09:42:58+5:302017-10-13T15:14:28+5:30
वरद चव्हाणने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने गेल्या काही वर्षांत खूप चांगल्या ...
>वरद चव्हाणने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने गेल्या काही वर्षांत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने त्याचा एक वेगळा फॅन फॉलोव्हिंग निर्माण केला आहे. रुंजी, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये त्याने नुकतेच काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याशिवाय त्याने तुमचं आमचं सेम नसतं या नाटकाद्वारे त्याने रंगभूमीवर एंट्री घेतली. वेलकम टू पट्टाया या चित्रपटातही तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागेची मुख्य भूमिका आहे. वरदने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. या चित्रपटानंतर आता वरद आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.
Also Read : ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून वरद चव्हाणची रंगभूमीवर एंट्री
Also Read : ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून वरद चव्हाणची रंगभूमीवर एंट्री
वरदचे फॅन नेहमीच सोशल मीडियावर त्याला फॉलो करत असतात. त्याच्या सोशल मीडियावर त्याला अनेक फॉलोव्हर्स आहेत. वरदने त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी सोशल मीडियावर नुकतीच दिली आहे. वरद लवकरच नवीन चित्रपटात झळकणार असल्याची बातमी त्यानेच फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने एक फोटो फेसबुकला पोस्ट केला असून त्यात आपल्याला क्लॅपबोर्ड पाहायला मिळत आहे. त्यावर प्रगती पिक्चर्स करार प्रेमाचा असे लिहिले आहे. या फोटोसोबत नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिला दिवस असून या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. या त्याच्या फोटोला अनेक लाइक्स मिळाल्या असून अनेक जणांनी या त्याच्या फोटवर कमेंट देखील केले आहे.
करार प्रेमाचा या चित्रपटात त्याचे सह कलाकार कोण असणार आहेत. तसेच हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार आहे. याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. वरद गेल्या पाच वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. वरदने त्याच्या वडिलांच्या नावाचा वापर न करता स्वतःचे करियर निर्माण केले आहे. ऑन ड्युटी २४ तास, खो खो यांसारख्या चित्रपटातील आणि अजून ही चांद रात आहे, मंगळसूत्र यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.