वर्षा उसगांवकर ३६ वर्षांनंतर या अभिनेत्यासोबत पुन्हा करताहेत काम, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:28 PM2022-02-15T17:28:55+5:302022-02-15T17:29:34+5:30
Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर लवकरच रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील माईंच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. दरम्यान आता वर्षा उसगांवकर लवकरच रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत. इतकेच नाही तरी तब्बल ३६ वर्षांनंतर वर्षा उसगांवकर अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहेत. प्रशांत दामले यांनीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
प्रशांत दामले यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत वर्षा उसगांवकर, संकर्षण कऱ्हाडे दिसत आहेत. यात हे तिघेही त्यांच्या आगामी नाटकाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा मी आणि वर्षा रंगमंचावर! सादर आहे आमचे नवीन नाटक, 'सारखं काहीतरी होतंय' लवकरच रंगमंचावर. लेखन व दिग्दर्शन - संकर्षण कऱ्हाडे. नाटकाच्या पुढील अपडेटसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पेज फॉलो करा...असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'सारखं काहीतरी होतंय' या नाटकाच्या निमित्ताने तब्बल ३६ वर्षांनंतर वर्षा उसगांवकर- प्रशांत दामले एकत्र दिसणार आहेत. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या व्हिडिओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने म्हटले की, ही तर पर्वणीच आहे रसिक प्रेक्षकांसाठी.. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, वा मस्तच उत्सुकता ताणली गेली,लवकर होऊ दे शुभारंभ.