Ved Marathi Movie : जिनिलिया रोज नटून थटून बसायची, चौथ्या दिवशी..., रितेशने सांगितला लग्नानंतरचा धम्माल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:03 PM2022-12-28T16:03:35+5:302022-12-28T16:14:26+5:30

Riteish Deshmukh, Genelia Deshmukh : ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलियाच्या पर्सनल लाईफमधील एक ना अनेक धम्माल किस्सेही ऐकायला मिळत आहेत. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने असाच एक भन्नाट किस्सा ऐकवला

Ved Marathi Movie interview with Riteish Deshmukh & Genelia Deshmukh | Ved Marathi Movie : जिनिलिया रोज नटून थटून बसायची, चौथ्या दिवशी..., रितेशने सांगितला लग्नानंतरचा धम्माल किस्सा

Ved Marathi Movie : जिनिलिया रोज नटून थटून बसायची, चौथ्या दिवशी..., रितेशने सांगितला लग्नानंतरचा धम्माल किस्सा

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh)- जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (30 डिसेंबर) रिलीज होतोय. रिलीजआधीच या सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलियाच्या पर्सनल लाईफमधील एक ना अनेक धम्माल किस्सेही ऐकायला मिळत आहेत. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने असाच एक भन्नाट किस्सा ऐकवला. हा किस्सा आहे, रितेश व जिनिलियाच्या लग्नानंतरचा...

लग्नानंतर पहिल्यांदा  सासरी आलेली प्रत्येक नवी सून काहीशी गोंधळलेली असते. मनातून काहीशी घाबरलेली असते. सासरच्या मंडळींसोबत जुळवून घ्यायचा. नव्या घराच्या चालीरिती शिकण्याचा प्रयत्न करत असते. जिनिलिया सुद्धा याला अपवाद कशी ठरेल? लग्नानंतर जिनिलिया पण काहीशी घाबरलेली होती. 
याबद्दल जिनिलिया मनमोकळेपणानं बोलली. ती म्हणाली, लग्नानंतर मी कसं मॅनेज करणार? माझं कसं होणार? असे प्रश्न मला पडले होते. पण मी सासरी गेले आणि आईसोबत (सासूबाई) माझं नातं इतकं घट्ट झालं की, आज रितेशपेक्षा जास्त मी त्यांच्याशी बोलते. दररोज आम्ही मस्तपैकी गप्पा मारतो....
जिनिलिया हे सगळं सांगत असतानाच, मध्येच  मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो म्हणत रितेश बोलू लागतो...

कुणीतरी सांगितलं आणि...
रितेशने सांगितलं, ‘आमचं लग्न झालं. साहजिकच लग्न झाल्यावर जिनिलियाला अनेक प्रश्न पडले होते. संस्कृती वेगवेगळी असते, चालीरिती वेगवेगळ्या असतात, अशावेळी तिला पडलेले प्रश्न स्वाभाविक होते. तर हिला कोणीतरी सांगितलं की नववधू म्हणून तू रोज मस्तपैकी सजून बसलं पाहिजे. तर लग्नानंतर पहिला दिवस होता. मी उठलो, टी-शर्ट, टॅÑक पॅन्ट घालून खाली आलो. आणि ही साडी, कानात मोठमोठे झुमके वगैरे अगदी सजून धजून बसलेली होती. खरं तर माझं लक्ष पण गेलं नाही. डायनिंगवर बसलो, पप्पा होते, मम्मी होती... ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि सगळे आपआपल्या कामाला गेले. तीन दिवस हे असंच चाललं. चौथ्या दिवशी मात्र जिनिलिया आली आणि थेट ‘मी हे आणखी नाही करू शकत’, असं मला म्हणाली. मी म्हटलं काय करू शकत नाही....? त्यावर म्हणाली, हे असं रोज सजून बसणं... वगैरे... मी तिला म्हणालो, कुणी सांगितलं तुला असं सजायला? त्यावर नववधूने असंच राहायला असं कुणीतरी मला सांगितलेलं, असं ती म्हणाली. यावर मला हसू आवरलं नाही. मी तिला म्हणालो, मी रोज चड्डी-टीशर्ट घालून खाली बसतो. मला वाटलं की, तुलाच असं सजून धजून बसायचं असेल, म्हणून मी काही बोललो नाही... यानंतर पाचव्या दिवशी आम्ही दोघंही टी-शर्ट- ट्रॅक पॅन्ट घालून खाली...

रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’  या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. रितेश व जिनिलीया या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय हा सिनेमा रितेश दिग्दर्शित करतोय.

Web Title: Ved Marathi Movie interview with Riteish Deshmukh & Genelia Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.