Ved Marathi Movie: अक्षय कुमार, अजय देवगणसह 'या' १० स्टार्सवर रितेश देशमुखचा 'वेड' पडला भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:28 PM2023-01-17T19:28:10+5:302023-01-17T19:29:11+5:30

Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपट पुढील काही दिवसांत ५० कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केलीय.

Ved Marathi Movie: Riteish Deshmukh's 'crazy' on 'Ya' 10 stars with Akshay Kumar, Ajay Devgan! | Ved Marathi Movie: अक्षय कुमार, अजय देवगणसह 'या' १० स्टार्सवर रितेश देशमुखचा 'वेड' पडला भारी!

Ved Marathi Movie: अक्षय कुमार, अजय देवगणसह 'या' १० स्टार्सवर रितेश देशमुखचा 'वेड' पडला भारी!

googlenewsNext

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत वेड या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४७.६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. वेडमधून जिनिलिया डिसूझा-देशमुखने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि पुढील काही दिवसांत हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केली आहे.

बॉलिवूडच्या १० कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वेडपेक्षाही कमी होते. अक्षयच्या या चित्रपटाने जवळपास ४४.३९ कोटींची कमाई केली होती. तर या चित्रपटाचा बजेट सुमारे ७० कोटी रुपये होता. तसेच शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप कमी होते. २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त १९.६८ कोटींची कमाई केली होती.

अमिताभ बच्चन यांच्या उंचाई या सिनेमाची कमाई वेडपेक्षा कमी आहे. उंचाईचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ३४.१५ कोटी रुपये इतके होते. रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाने फक्त ३५.५० कोटींची कमाई केली. रितेशच्या वेडने आयुषमान खुरानाच्या डॉक्टर जी, राजकुमार रावच्या बधाई दो, सनी देओलच्या चुप, टायगर श्रॉफच्या हिरोपंती २, अर्जुन कपूरच्या एक व्हिलन रिटर्न्स आणि जॉन अब्राहमच्या अटॅक या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन्सच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Web Title: Ved Marathi Movie: Riteish Deshmukh's 'crazy' on 'Ya' 10 stars with Akshay Kumar, Ajay Devgan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.