Ved Marathi Movie : टांझानियाचे पॉल भावंडं म्हणतात, 'वेड लागलंय, लागलंय...' रितेशचे वेड पोहोचले सातासमुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:59 AM2023-01-12T08:59:20+5:302023-01-12T09:00:40+5:30
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला टांझानियाच्या किली पॉलने चक्क आता मराठी गाण्यावर ठेका ठरलाय.
Ved Marathi Movie : मराठी चित्रपट 'वेड' ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रितेश जिनिलियाची केमिस्ट्री असो किंवा रितेश आणि सलमानचे 'वेड लागलंय' गाणं असो, हा सिनेमा काही थांबायचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला टांझानियाच्या किली पॉलने (Kili Paul) चक्क आता मराठी गाण्यावर ठेका ठरलाय. 'वेड लागलंय वेड लागलंय' या गाण्याची स्टेप खूपच लोकप्रिय होत आहे. यावरच किली पॉलने आणि त्याच्या बहिणीने डान्स केलाय.
इन्स्टाग्राम सेन्सेशन असलेले किली पॉल आणि निमा पॉल (Kili Paul and Nima Paul) ही भावंडं कायम बॉलिवूड गाण्यांवर डान्स किंवा लिपसिंक किंवा अभिनय करत असतात. हे करताना ते स्वत: इतके एंजॉय करत असतात की आपलेही मनोरंजन होते. आत्तापर्यंत तुम्ही दोघांना बॉलिवूडच्या हिंदी गाण्यांवर स्टेप करताना, रील बनवताना पाहिले आहे. पण आता दोघांनी थट मराठी गाण्यावर ठेका धरलाय. रितेश आणि सलमानची वेड लागलंय ही स्टेप आयकॉनिकच बनली आहे. म्हणूनच टांझानियाचे हे भावंडंही म्हणत आहेत मला वेड लागलंय, लागलंय, लागलंय...
दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर रितेशनेही कमेंट करत 'तुम्ही खूप भारी आहात, खूप प्रेम' असे म्हणले आहे. तर अखेर मराठी गाण्यावरही दोघं नाचले म्हणून मराठी प्रेक्षक खूश झाले आहेत. रितेशच्या वेड सिनेमाची लोकप्रियता पाहता त्याने मराठी सिनेमा सातासमुद्रापार नेऊन पोहोचवला आहे.
वेडने आत्तापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. बॉक्सऑफिसवर कमाईचा आकडा पाहता वेडने सैराट चा ही रेकॉर्ड मोडला आहे. आत्तापर्यंत वेड सिनेमाने एकूण ३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. अजूनही तिसऱ्या आठवड्यातही वेड ची घौडदौड सुरु आहे.