Ved Marathi Movie Box Offiec Collection : 'वेड' काही थांबत नाही, सोमवारीही तब्बल १ कोटीची कमाई, एकूण आकडा वाचून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:59 AM2023-01-18T10:59:29+5:302023-01-18T11:01:52+5:30

रितेश देशमुख आणि जिनिलीया या 'क्युट कपल'चा 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

ved superhit at box office 48.7 cr box office collection still going on | Ved Marathi Movie Box Offiec Collection : 'वेड' काही थांबत नाही, सोमवारीही तब्बल १ कोटीची कमाई, एकूण आकडा वाचून व्हाल थक्क !

Ved Marathi Movie Box Offiec Collection : 'वेड' काही थांबत नाही, सोमवारीही तब्बल १ कोटीची कमाई, एकूण आकडा वाचून व्हाल थक्क !

googlenewsNext

Ved Marathi Movie Box Offiec Collection : रितेश देशमुख आणि जिनिलीया या क्युट कपलचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल २० दिवस झाले चित्रपटाची जादू अजुनही कायम आहे. चित्रपटाने आतापर्यंत ४८ कोटींचा गल्ला जमवला आहे.सोमवारच्या दिवशीही वेड साठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १९ दिवस झाले आहे, पण चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. रितेश आणि जिनिलीया दोघांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रितेश जिनिलियाची 'वेड' मधील जोडी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.१८ कोटी तर दुसऱ्या आठवड्यात २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण ४८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच वेड ५० कोटींचा टप्पाही ओलांडेल असे चित्र आहे. जिनिलियाने पोस्ट शेअर करत म्हणले, 'कधीही न थांबणारे असे प्रेम दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद.'

Ved Marathi Movie : रितेश जिनिलियाचं रोमॅंटिक सॉंग, 'वेड तुझा' गाणं पुन्हा नवीन रुपात

'वेड' मधील कलाकारांचा अभिनय असो,किंवा गाणी असो सर्वांना चित्रपटाने खरोखर वेड लावले आहे. त्यात रितेश जिनिलियाची जोडी पडद्यावर जादू दाखवतेच. वेड सध्या विक्रमावर विक्रम रचत आहे.बॉक्सऑफिसवरील वेड चा धुमाकूळ काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र आहे.

Web Title: ved superhit at box office 48.7 cr box office collection still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.