Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 11:52 AM2022-12-07T11:52:15+5:302022-12-07T12:03:00+5:30

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक...

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll | Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

googlenewsNext

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक. होय,  दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातअक्षय कुमार शिवरायांची भूमिका साकारतो आहे. काल अक्षयने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला. सोबत शूटींग सुरू झाल्याचीही माहिती दिली. यानंतर काय तर  सोशल मीडिया युजर्सनी अक्षयला ट्रोल करायला सुरूवात केली.

होय, छत्रपतींच्या लुकमधला अक्षय नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत अक्षय अजिबात शोभून दिसत नसल्याचं म्हणत अनेकांनी अक्षयची जबरदस्त खिल्ली उडवली. इतकंच नाही, अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओतील एक मोठी चूकही नेटकऱ्यांनी नेमकी पकडली. यावरूनही नेटकऱ्यांनी अक्षय कुमार व दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मजा घेतली.


 
अक्षय कुमार अन् बल्बचं झुंबर...
होय, अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अक्की महाराजांच्या पेहरावात दिसत आहे. त्याच्या डोक्यावर छतावर  बल्बचं झुंबर लटकलेलं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ते १६८० या काळात साम्राज्य केलं. थॉमस एडिसनने १८८० मध्ये बल्बचा शोध लावला, मग बल्बचं झुंबर कसं काय?, हा प्रश्न अनेकांना पडला. अनेकांनी यावरून अक्षय व मांजरेकरांची मजा घेतली. 

आव्हाड यांचीही टीका

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या सिनेमावर टीका केली आहे. ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- वेडात मराठे वीर दौडले सात. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.  

‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुज्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे. 

Web Title: Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.