वीणा जामकरचा आगामी सिनेमा 'लाव'चा मुहूर्त संपन्न, या ठिकाणापासून होणार शूटिंगला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:51 IST2021-03-19T14:51:13+5:302021-03-19T14:51:19+5:30
'लाव' चित्रपटातून अभिनेत्री सुहानी निंबाळकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

वीणा जामकरचा आगामी सिनेमा 'लाव'चा मुहूर्त संपन्न, या ठिकाणापासून होणार शूटिंगला सुरुवात
मराठी चित्रपट लाव' या चित्रपटाचे गाणे रेकाॅर्डींग करुन चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. चित्रपटामध्ये मुलींच शिक्षण, त्यांच्यामध्ये असलेला शिक्षणाचा आभाव, बाल विवाह, बाल माता ह्या गंभीर विषयांवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे. 'लाव' ह्या मराठी चित्रपटापासून अभिनेत्री सुहानी निंबाळकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.तसेच चित्रपटामध्ये अभिनेता तन्मय सांडवे सोबत चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता मिलींद शिंदे,अनिल नगरकर आणि अभिनेत्री विणा जामकर महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत, सोबतच बाल कलाकार क्षितीजा भालेराव ही असेल.
चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल राजकुमार कांबळे करत असून लेखन श्रीकांत शिंदे ह्यांचे आहे तर चित्रपटाला संगीत मिलिंद मोरे ह्यांचे आहे. गायक शिध्दार्थ जाधव ,गितकार सुबोध पवार,आकाश पवार,नृत्य दिग्दर्शक राजेश पडवळे,सिनेमॅटोग्राफर गणेश पवार आणि कार्यकारी निर्माता पोपट जी.कांबळे ही संपूर्ण टीम आप आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. चित्रपटाचा मुहूर्त झाला असून आता लवकरच चित्रपटाच्या शुटींगला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व निफाड तालुक्यात सुरवात होणार आहे.