बहुचर्चित अ.ब.क. ८ जूनला प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 06:42 AM2018-06-07T06:42:14+5:302018-06-07T12:12:14+5:30
आजचा मराठी चित्रपट एक वेगळया उंचीवर स्थिराला आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांनीही कंबर कसली आहे. याच ...
जचा मराठी चित्रपट एक वेगळया उंचीवर स्थिराला आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांनीही कंबर कसली आहे. याच धरतीवर मराठी चित्रपटात नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. यातच अ.ब.क. या उच्चनिर्मिती आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम, याचसोबत हिंदी आणि मराठी चित्रपटातील तगडी स्टारकास्ट असण प्राप्त झाल्याने चित्रपट इंडस्ट्रीत अ.ब.क. चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘चला हवा येवू द्या’ च्या मंचावर सुनील शेट्टी आणि अ.ब.क. टिमची धमाल मस्ती अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली आहे ! हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करीत असला तरी प्रबोधनाचा मार्ग ही स्विकारत आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी आहे. महिला सक्षमीकरण ही काळाची आहे. अगदी हाच धागा पकडून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा भौगोलिक संदेश अ.ब.क. चित्रपट देतो.
ग्रॅव्हीटी एंटरटेनमेंट प्रस्तुत व मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित अ.ब.क. हा चित्रपट येत्या ८ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी सर, रवीकिशन असे हिंदीतील दिग्गज कलावंत अ.ब.क. चित्रपटाद्वारे मराठीत पर्दापण करीत आहेत. यासोबतच हिंदीतील आघाडीचे संगीतकार साजिद वाजिद यांनी अ.ब.क. च्या संगीतसंयोजनाची बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या गीतांना आदर्श शिंदे व अमृता देवेंद्र फडणवीस यांचे पार्श्वगायन लाभले आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कॅमेरामन महेश आने यांचे छायांकन चित्रपटास व उंचीवर नेते. बहिण भावाच्या नात्याची अनोखी गुंफन असणाऱ्या या चित्रपटाचे कथा, पटकथा संवाद लेखक आबा गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी कलावंतांची मोठी फौज आहे. किशोर कदम, कमलेश सावंत, सतीश पुळेकर, प्रेमा किरण, विजय पाटकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. राज्य पुरस्कार विजेता साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, आर्या घारे सह ऑस्कर फेम सनी पवार या बालकलाकारांचा चित्रपटात दमदार अभिनय पहावयास मिळणार आहे. अ.ब.क. या बहुचर्चित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी भक्कमपणे सांभाळली आहे. मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित अ.ब.क हा वेगळया विषयावरी चित्रपट येत्या ८ जून पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तो नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल.... अ.ब.क. ही कथा आहे. अनाथ हरी आणि जनी या दोन लहान जीवांची, हरीलाआपली लहान बहिण जनीचं स्वप्न पूर्ण करायचंय; पण अडचणी आभाळा एवढ्या, पण मोठ्या जिद्दीने हरी संकटावर मातकरतो, जिथे माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो, त्याच स्मशानात हरी आणि जनीच्या आयुष्याची सुरूवात होते आणि हरीसमाजासमोर नवा आदर्श निर्माण करतो, अर्थातच त्याच्या वेदनादाई प्रवासाचे सहकारी कोण ? स्मशानाचं बदलतं रूपआणि हरीची कल्पकता प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावर पाहणे इष्ट ठरेल. समाजातील वास्तवाचे भावविश्व उलगडून दाखविणाराअ.ब.क. हा बहुचर्चित चित्रपट येत्या ८ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे......!