मराठी कलाविश्वावर पुन्हा आघात; 'पुढचं पाऊल'फेम ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 14:10 IST2023-08-25T14:09:59+5:302023-08-25T14:10:59+5:30
Milind safai:मिलिंद सफई यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं होत.

मराठी कलाविश्वावर पुन्हा आघात; 'पुढचं पाऊल'फेम ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं नुकतंच निधन झालं आहे. कर्करोगामुळे त्यांची आज (२५ ऑगस्ट) सकाळी १०.४५ वाजता प्राणज्योत मालवली. अभिनेता जयवंत वाडकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मिलिंद यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
मिलिंद सफई यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं होत. इतकंच नाही तर त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही बरंच काम केलं होतं. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा कलाविश्वावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिलिंद यांनी लकडाऊन बी पॉझिटिव्ह, प्रेमाची गोष्ट, थॅक्यू विठ्ठला, मेकअप आणि पोस्टर बॉईज या सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसंच आई कुठे काय करते, आशिर्वाद तुझा एकविरा आई,सांग तू आहेस का, 100 डेज, पुढचं पाऊल या मालिकेतही त्यांनी काम केलं आहे.