ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची बाधा, स्वत: दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:02 PM2021-05-10T16:02:46+5:302021-05-10T16:07:12+5:30
घरात राहा आणि सुरक्षित राहा... मी कोरोना पॉझिटीव्ह आहे...! लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग
देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज व्हायरसचे शिकार ठरलेत. आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत, याऊपरही त्यांना कोरोनाने गाठले. (Mohan Joshi tests positive for COVID-19)
घरात राहा आणि सुरक्षित राहा... मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टास्टोरी त्यांनी शेअर केली आहे. सध्या ते घरीच आयसोलेशनमध्ये असल्याचे कळतेय.
मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत गोव्यात या मालिकेचे शूटींग सुरु होते. मोहन जोशीही शूटींगनिमित्ताने गोव्यात होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच एंटरटेनमेंट सोसायटी आॅफ गोवाने राज्यात शूटींगची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच मालिकेची अख्खी टीम मुंबईला परतली होती.
नाटक, चित्रपट आणि टिव्ही मालिका या तिन्ही क्षेत्रात हुकूमत असणार असणा-या मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून त्यांनी किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौ-यांसाठी सुट्ट्या लागायच्या़ एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुस-या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. पुढे ते अभिनयक्षेत्रातच स्थिरावले. अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या.