मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:04 AM2023-01-11T11:04:30+5:302023-01-11T11:04:52+5:30

Chitra Navathe : पन्नासच्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

Veteran actress Chitra Navathe of Marathi Cine Industry passed away | मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

googlenewsNext

पन्नासच्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंडमधल्या सरला नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलविता धनी, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, टिंग्या अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले होते. त्या गेले काही वर्ष आप्त आणि नातेवाईक असूनही वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करत होत्या.

चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर होते. दादरमधील मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसूम आणि कुमूद सुखटणकर या बहिणींनी १९४५च्या दरम्यान मराठी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून भूमिका करायला सुरुवात केली होती. गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा ठेवले होते. १९५२ साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट हा या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्यासोबत चित्रा यांचे लग्न झाले होते. 
अलीकडच्या काळात त्यांनी बोक्या सातबंडे, अगडबंब या चित्रपटात काम केले होते. टिंग्या हा चित्रपट त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केला होता.

Web Title: Veteran actress Chitra Navathe of Marathi Cine Industry passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.