ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर रूग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 01:33 PM2016-12-01T13:33:17+5:302016-12-01T13:35:38+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर रविवारी लावण्यसंगीत या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ...
्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर रविवारी लावण्यसंगीत या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांच्यावर परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा कार्यक्रम यशवंत नाट्यमंदिरमध्ये सादर करण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाºया कलावंत म्हणून मधु कांबीकर यांना ओळखले जाते. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लावण्य संगीत या लावणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मधु कांबीकर १० ते १२ वर्षांनंतर लावणी सादर करणार होत्या. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची जोरदार तालिमही सुरू होती. वयाच्या साठीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करताना त्यांच्यावर काहीसा ताण होता. मात्र त्यांची जिद्द मोठी होती. एक होता विदुषक, झपाटलेला, डेबू , येऊ का घरात, मला घेऊन चला असे अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पुणे शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना झालेला नटवर्य केशवराव दाते पुरस्कार म्हणजे एका गुणी अभिनेत्रीचा यथोचित गौरव आहे. प्रतिकुल परिस्थितीत ही या अभिनेत्रीने अभिनय सामर्थ्याच्या जीवावर मराठी चित्रपटसृष्ट्रीत स्वत:चे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. त्या मुळच्या बीडच्या आहेत. त्यांचे वडिलदेखील एक कलाकार आहेत. त्यांचा बीड जिल्हयातील कांबी गावापासून सुरू झालेल्या प्रवासात अनेक संकटे आली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली आहे. तसेच त्यांनी अस्सल लावणी लोकांपर्यत पोहोचविण्यासाठीअखंड प्रयत्नदेखील केला आहे. त्याचप्रमाणे त्या कोणत्याही भूमिका साकारू शकतात ते त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना दाखवून दिले आहे.