Prema Kiran: ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 08:55 IST2022-05-01T08:54:49+5:302022-05-01T08:55:49+5:30
Prema Kiran: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

Prema Kiran: ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं आज पहाटे निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६१ वर्षांच्या होत्या. ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटामधील त्यांच्या नायिकेच्या भूमिका गाजल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले होते. त्यातही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली होती.
धुमधडाका चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका केली होती. त्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. त्याबरोबरच दे दणादण, कुंकू झाले वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले होते.
तसेच तसेच प्रेमा किरण यांनी निर्मिती क्षेत्रामध्येही योगदान दिले होते. त्यांनी १९८९ मध्ये उतावळा नवरा नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांच्या या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.