ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 03:48 AM2017-05-18T03:48:19+5:302017-05-18T12:09:37+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात ...

Veteran actress Rima Apu passes away | ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

googlenewsNext
येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बुधवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.   त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहिर केली. ओशिवरा येथील स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणा-या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त चित्रपटसृष्टीसह सर्वांसाठीच एक धक्का आहे. 
 मेने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपेक हैं कोन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ हैं या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. रिमा लागू यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने लक्ष वेधून घेतले.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरु झाला. मराठी रंगभूमीपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’ ‘बुलंद’ ही त्यांनी अभिनय केलेली नाटक गाजली. तर मराठीतील अनेक चित्रपटात त्यांनी हिरोईनची भूमिका देखील केली आहे. सिंहासन, आंतरपाट, आपली माणसं, जिवलगा इत्यादी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात त्या नेहमी असायच्या. मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपेक हैं कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं, हम साथ साथ हैं या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
हिंदी सिरियलमधल्या त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या. त्यात श्रीमान श्रीमती या सिरियलमधली कोकीची भूमिका, तर तु तु मे मे या सचिनच्या सिरियलमधली सासूची भूमिका विशेष गाजली. रिमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Also read : Exclusive : ​या मराठी अभिनेत्याच्या रिमा लागू कन्या आहेत असाच अनेकांचा समज होता

Also read : Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?

Also read : Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

Web Title: Veteran actress Rima Apu passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.