मालवणी नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:56 IST2024-03-26T18:55:15+5:302024-03-26T18:56:00+5:30
मालवणी नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे मालवणचे सुपुत्र लवराज कांबळी काळाच्या पडद्याआड

मालवणी नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांचं निधन
मालवण रेवंडी गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते लवराज कांबळी यांचं निधन झालंय. ते उत्कृष्ट कला दिग्दर्शकही होते. 'मालवणी नटसम्राट' म्हणून लवराज कांबळी यांची ओळख होती. आज अल्पशा आजाराने मुंबई त्यांचं दुःखद निधन झालं. मच्छिंद्र कांबळींच्या 'वस्त्रहरण' नाटकातील त्यांनी साकारलेली भोप्याची भूमिका अजरामर ठरली.
प्रेमळ, साधं राहणीमान आणि मनमिळाऊ स्वभाव अशी लवराज कांबळींची ओळख होती. लवु आणि अंकुश कांबळी या जोडीने ८०-९० च्या दशकात गिरणगावात त्यांच्या कलेच्या माध्यमातून चांगलीच ओळख प्रस्थापित केली. मालवणी भाषा आणि नाटकं गावाखेड्यांत पोहोचवण्याचं महत्वाचं काम लवराज कांबळी यांनी केलं. मालवणी नाटकांतील एक हिरा गमावला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असून सर्वजण लवराज कांबळी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.