ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टी हळहळली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 06:10 AM2018-05-06T06:10:42+5:302018-05-06T11:41:53+5:30

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन झाले आहे. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा ...

Veteran singer Arun Dte passed away; Marathi cinemas have become heartbroken | ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टी हळहळली

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टी हळहळली

googlenewsNext
येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन झाले आहे. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ४ मे रोजी त्यांचा ८४ वा वाढदिवस होता. या निमित्ताने पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृती ठीक नसल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. 

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, असं म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांच्या निधनाने भावगीतातील शुक्रतारा हरपल्याची भावना व्यक्त होतेय. अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केले. भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दाते यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने अजरामर केली. शुक्रतारा मंदवारा हे अरुण दाते यांचे गाणे अतिशय गाजले. 

१९६२ मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. दाते यांनी हे गाणं गावे, यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना कायम आग्रह करायचे. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाणे गायचे टाळले. मात्र अखेर हे गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि ते अफाट गाजलं. यानंतर पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांमध्येही ‘शुक्रतारा’ गाऊ लागले. २०१०पर्यंत अरुण दाते यांनी शुक्रतारा या नावानं मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होतेय.

 

Web Title: Veteran singer Arun Dte passed away; Marathi cinemas have become heartbroken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.