‘अमर फोटो स्टुडीओ’ची विदर्भवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 12:07 PM2018-01-17T12:07:53+5:302018-01-17T17:37:53+5:30
सुबकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाट्यकृतीने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या ...
स बकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाट्यकृतीने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांनी सुरेख कॅलिडोस्कोप द्वारे मनोरंजनाची ‘फुल्ल ऑन’ मेजवानी रसिकांना या नाट्यकृतीच्या माध्यमातून दिली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा तसेच मटा व झी गौरव पुरस्कारांवर आपली ठसठशीत मोहोर उमटवणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असून सध्या या नाटकाची टीम विदर्भाच्या दौऱ्यावर आहे.
विविध शहरात झालेल्या ‘अमर फोटो स्टुडीओ’च्या प्रयोगांना आजवर दमदार प्रतिसाद मिळाला असून विदर्भाच्या दौऱ्याला सुद्धा नाट्यरसिक जोरदार प्रतिसाद देतील यात शंका नाही. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे अशी गुणी व युवा कलाकारांची टीम या नाटकात आहे.प्रसिद्धीपासून प्रयोगापर्यंत सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपणाऱ्या या नाटकाच्या यशात अभिनेता सुनील बर्वे यांचा मोलाचा वाटा आहे.
पुढील प्रमाणे या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत.
२० जानेवारी - जवाहरलाल दर्डा व सभागृह मेडिकल कॉलेज यवतमाळ (रात्री ८ वाजता)
२१ जानेवारी – संत ज्ञानेश्वर नाट्यगृह अमरावती ( रात्री ९ वाजता )
२२ जानेवारी – वसंतराव देशपांडे नाट्यगृह नागपूर ( रात्री ७ वाजता )