Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 17:33 IST2022-05-16T17:20:12+5:302022-05-16T17:33:00+5:30
Actor Sushant Shelar's car vandalized : याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यात सुशांतच्या गाडीचं नुकसान झालं आहे. गाडीची तोडफोड का आणि कुणी केली, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सुशांतने म्हटलं आहे. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकारसीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी सुशांत ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे, तशी माहिती सुशांतने दिली आहे. पोलीस या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असून ही घटना नक्की कोणी घडवून आणली का? याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना सुशांत म्हणाला की, १५ तारखेला मध्यरात्री २ च्या दरम्यान एका अज्ञाताने हल्ला करून गाडीची काच फोडली. त्याने असं का केलं हे तर मला माहीत नाही, पण मी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करणार आहे. हा भ्याड हल्ला आहे.
अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/G5Nunm0efJ
— Lokmat (@lokmat) May 16, 2022