आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारेचा हा व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 11:32 AM2017-05-18T11:32:30+5:302017-05-18T17:02:30+5:30
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारेचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. उर्मिलाने आदिनाथच्या वाढदिवसाच्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
आ िनाथ कोठारेचा नुकताच वाढदिवस झाला. त्याचा हा वाढदिवस त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबत धुमधडाक्यात साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची पत्नी उर्मिला कोठारेने एक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे.
उर्मिलाने इन्स्टाग्रामला अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आदिनाथ अतिशय चिडलेला आपल्याला दिसत असून उर्मिला त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसोबत माय अँग्री यंग मॅन विश यु हॅपी बर्थडे असे तिने कॅप्शन देखील लिहिले आहे.
उर्मिलाने हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून त्याला दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून त्यावर दोनशेहून अधिक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून आदिनाथ आणि उर्मिलाच्या फॅन्सना तो प्रचंड आवडत आहे.
आदिनाथ आणि उर्मिला यांची जोडी मराठी इंडस्ट्रीतील एक क्युट जोडी मानली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची ओळख शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा उर्मिलाचा पहिलाच चित्रपट होता तर या चित्रपटासाठी आदिनाथ साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.
आदिनाथ आणि उर्मिला यांच्या लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाली असून ते नेहमीच समारंभात, पार्टीत एकत्र पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीची नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चा असते.