VIDEO: रिंकू राजगुरूची अदाच न्यारी अन् तिचा व्हिडीओदेखील लयभारी, चाहत्यांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:36 AM2021-02-27T10:36:51+5:302021-02-27T10:37:24+5:30

रिंकू राजगुरूच्या व्हिडीओला मिळतेय चाहत्यांची पसंती

VIDEO: Rinku Rajguru shared new video on instagram | VIDEO: रिंकू राजगुरूची अदाच न्यारी अन् तिचा व्हिडीओदेखील लयभारी, चाहत्यांना पाडली भुरळ

VIDEO: रिंकू राजगुरूची अदाच न्यारी अन् तिचा व्हिडीओदेखील लयभारी, चाहत्यांना पाडली भुरळ

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. यात ती केस उडवताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओतील अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.


हल्ली रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावतोदेखील आहे.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.


या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.


प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: VIDEO: Rinku Rajguru shared new video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.