VIDEO: काय होतीस तू काय झालीस तू...! मानसी नाईकचा अतरंगी व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:59 PM2022-07-27T12:59:29+5:302022-07-27T12:59:54+5:30

Manasi Naik: मराठी कलाविश्वातील ऐश्वर्या राय अशी ओळख मिळवणाऱ्या मानसीने नुकताच हटके लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO: What were you, what have you become...! Mansi Naik's Atrangi video viral | VIDEO: काय होतीस तू काय झालीस तू...! मानसी नाईकचा अतरंगी व्हिडीओ व्हायरल

VIDEO: काय होतीस तू काय झालीस तू...! मानसी नाईकचा अतरंगी व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi naik). अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते. यात बऱ्याचदा ती तिच्या पतीसोबत म्हणजेच प्रदीप खरेरासोबत (Pradip Kharera) व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत असते. मराठी कलाविश्वातील ऐश्वर्या राय अशी ओळख मिळवणाऱ्या मानसीने नुकताच हटके लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने नुकताच अतरंगी मेकअपमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने केस बांधलेले असून डायमंडनं सजवलेलं आहे. नाकात नथ घातली आहे. या व्हिडीओत ती तेरी मेरी प्यार की बातें या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. तिचा हा अतरंगी व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मानसी नाईक हे नाव आज सगळ्यांच्या परिचयाचे आहे. आपल्या नृत्यशैलीमुळे तिने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. मानसी नाईकने वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी कितीतरी गाणी सुपरहिट केली आहेत. तसंच ती 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकली आहे.

Web Title: VIDEO: What were you, what have you become...! Mansi Naik's Atrangi video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.