विद्याधर जोशी साकारणार खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 11:29 AM2017-02-03T11:29:12+5:302017-02-03T16:59:12+5:30

सध्या रांजण या चित्रपटाची चर्चा खूपच गाजत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावून ठेवले आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर ...

Vidyadhar Joshi will play villains | विद्याधर जोशी साकारणार खलनायक

विद्याधर जोशी साकारणार खलनायक

googlenewsNext
्या रांजण या चित्रपटाची चर्चा खूपच गाजत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावून ठेवले आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना दोन नवीन चेहरे पाहायला मिळतील. त्याचबरोबर या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेता विद्याधर जोशी ही खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.  प्रेक्षकांना या खलनायकासोबत विनोदाचे बादशाह असणारे भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील दिसणार आहे.हे दोन्ही विनोदी कलाकार पुन्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविण्यास सज्ज झाले आहे. असे हे मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे तीन कलाकार प्रेक्षकांना रांजण चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 
         
           प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित रांजण हा हा चित्रपट आहे.  या चित्रपटातील लागीर झालं रं या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण या विषयी सोशल
मीडियात चर्चा आहे. रांजण या चित्रपटात शाळेच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा आहे. मात्र, ती टिपिकल प्रेमकथेसारखी नाही. प्रेमाच्या पलीकडे जाऊन केलेला सामाजिक विचार आहे आणि हेच चित्रपटाचं वेगळेपणही आहे.

                श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी रांजणया चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Vidyadhar Joshi will play villains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.