विजय केंकरे शंभरीत, 'काळी राणी' नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:09 PM2022-12-03T19:09:39+5:302022-12-03T19:10:08+5:30

ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. ‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतंय.

Vijay Kenkare in 100th, 'Kali Rani' successful century of theater career with new play | विजय केंकरे शंभरीत, 'काळी राणी' नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

विजय केंकरे शंभरीत, 'काळी राणी' नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

googlenewsNext

ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या शैलीतील नाटकं प्रभावीपणे  प्रेक्षकांपर्यंत पोहचविणारे विजय केंकरे आता ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटयकारकिर्दीचं शतक साजरं करतायेत. ‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतयं. या नाटकाची खासियत म्हणजे विजय केंकरे यांचे जसे १०० वे नाटक आहे तसेच या नाटकाशी संबधित असलेल्या कलाकार तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या नाटयकारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. रत्नाकर मतकरी यांचे ९० वे नाटक,  प्रदीप मुळ्ये २०० वे नाटक, अजित परब ४० वे नाटक शीतल तळपदे १२५ वे नाटक, मंगल केंकरे ५० वे नाटक वे नाटक राजेश परब ५० वे नाटक, अक्षर शेडगे १४०० वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे ५१ वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ या नाटकाने साधला आहे. 

‘काळी राणी’ या नाटकात मनवा नाईक, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी, आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ ‘हमिदाबाईची कोठी’, ‘हॅम्लेट’ नंतर मनवा नाईक हीचं ‘काळी राणी’ हे नवीन नाटक आहे. डॉ. गिरीश ओक यांचा ६६६६ वा प्रयोग या नाटकाद्वारे रंगणार आहे.
हे नाटक आहे..एका राणी च..जिचं स्वप्न आहे.. मायानगरी  मधल्या रंगीबेरंगी दुनियेवर राज्य करण्याचं, एका अश्या लेखकाचं,ज्याचा प्रत्येक चित्रपट सिल्व्हर जुबली आहे ..ज्याच्या साठी फक्त स्वतःच नावच सर्वस्व आहे.आणि एका निर्मात्याच ज्यानी ह्या दोघाना  चित्रपट सृष्टी ची सफर घडवलेली आहे, हा निर्माता म्हणजे चित्रपटसृष्टी नी पाहिलेला सर्वात मोठा शो मॅन. एकमेकांच्या स्वप्नांत अडकलेल्या तीन व्यक्ती तुमच्या भेटीला येणार आहेत. ‘काळी राणी’ ह्या दोन अंकी नाटकामधून.

मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांचे असून दिग्दर्शन- विजय केंकरे यांचे आहे. नेपथ्याची प्रदीप मुळ्ये तर प्रकाशयोजनेची जबाबदारी शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. संगीत अजित परब यांचे असून वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. रंगभूषा राजेश परब यांची असून वेशभूषा संध्या खरात यांची आहे सूत्रधार संतोष शिदम आहेत.  या नाटकाचे निर्माते प्रिया पाटील,डॉ. माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम आहेत.

Web Title: Vijay Kenkare in 100th, 'Kali Rani' successful century of theater career with new play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.