​१३व्या महिंद्रा रंगभूमी सन्मान पुरस्कारांमध्ये विजया मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:44 AM2018-04-04T11:44:38+5:302018-04-04T17:14:38+5:30

महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड ( मेटा ) २०१८ सोहळ्यामध्ये यंदा ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना ( ...

Vijaya Mehta received the Jeevan Gaurav Award in the 13th Mahindra Theater Awards | ​१३व्या महिंद्रा रंगभूमी सन्मान पुरस्कारांमध्ये विजया मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार

​१३व्या महिंद्रा रंगभूमी सन्मान पुरस्कारांमध्ये विजया मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार

googlenewsNext
िंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड ( मेटा ) २०१८ सोहळ्यामध्ये यंदा ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना ( मेटा ) २०१८ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विजया मेहता या नामवंत दिग्दर्शिका असण्याच्या जोडीला १९६०च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीवरील आघाडीचे व्यक्तिमत्व आहेत. तसेच त्यांनी रंगायन या नाट्य कला अकादमीची देखील स्थापना केलेली आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते. विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासियत आहे. 
मेटा सोहळ्याचे हे १३ वे वर्ष असून यंदा परीक्षक मंडळामध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश होता. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि राष्ट्रीय कला अकादमी एनएसडीद्धच्या माजी संचालिका अमल अल्लाना, लोकप्रिय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री लिलिट दुबे, नाट्य दिग्दर्शिका नीलम मानसिंग चौधरी, चित्रपट निर्माते अभिनेते लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रजत कपूर, नामवंत छायाचित्रकार शास्त्रीय नृत्यकलाकार आणि शाम भारतीय कला केंद्राच्या संचालिका शोभा दीपक सिंग यांनी यंदा मेटा पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पहिले.
महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड ( मेटा ) २०१८ सोहळा येत्या १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथील कमानी प्रेक्षागृह आणि श्रीराम सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. परीक्षक मंडळ तसेच दिल्लीतील नाट्यरसिकांनी निवडलेले आणि नामांकन मिळालेले १० नाट्यप्रयोग यावेळी सादर होणार आहेत. जीवनगौरव पुरस्काराखेरीज आणखी १३ विविध विभागांमध्ये मेटा पुरस्कार दिले जाणार आहेत. ९ एप्रिल रोजी सायंकाळी होणाऱ्या रेड कार्पेट सोहळ्यात पुरस्कार वितरण पार पडणार आहे.
विजया मेहता या भारतीय चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका आहेत. तसेच समांतर चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठीही नावाजलेल्या आहेत. मुंबई येथील रंगायन या नाट्यकला अकादमीची स्थापना त्यांनी केलेली आहे. 

Web Title: Vijaya Mehta received the Jeevan Gaurav Award in the 13th Mahindra Theater Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.