Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली कळकळीची विनंती, म्हणाल्या..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:57 IST2022-11-24T14:52:20+5:302022-11-24T14:57:02+5:30
Vikram Gokhale health: अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली कळकळीची विनंती, म्हणाल्या..
Vikram Gokhale health update ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार,' विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.'
आता अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्या संदर्भात एक व्हॅट्सअॅपवर कौटुंबिक मित्र राजेश दामले यांचा मेडिकल बुलेटिनचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. यात लिहिले आहे की, ''विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही चिंताजनकच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.'' त्यांना लवकर बरे वाटावं ,ते सुखरूप असूदेत ह्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. असं कॅप्शन यासोबत दिलं आहे.
विक्रम गोखले गेल्या २४ तासांपासून अत्यवस्थ आहेत. डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आत्ताच काही सांगता येणार नाही, अशी माहिती पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माध्यमांना सांगितले, 'डॉक्टर्स आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांमध्ये सकाळी १० वाजता चर्चा झाली. विक्रम गोखले हे गंभीर असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ही अफवा आहे. उद्या सकाळी ११ वाजता मेडिकल बुलेटिन येईल.'