Vikram Gokhale: विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:37 AM2022-11-24T11:37:56+5:302022-11-24T12:01:15+5:30
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Vikram Gokhale health update ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार,' विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.'
#VikramGokhale is critical since the last 24 hours. Doctors are trying their best. He is not responding to the treatment as expected. He has multiple organ failures: Vrushali Gokhale, Vikram Gokhale's wife
— ANI (@ANI) November 24, 2022
(File photo) pic.twitter.com/wxh9VgUIVI
विक्रम गोखले गेल्या २४ तासांपासून अत्यवस्थ आहेत. डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आत्ताच काही सांगता येणार नाही, अशी माहिती पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माध्यमांना सांगितले, 'डॉक्टर्स आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांमध्ये सकाळी १० वाजता चर्चा झाली. विक्रम गोखले हे गंभीर असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ही अफवा आहे. उद्या सकाळी ११ वाजता मेडिकल बुलेटिन येईल.'
Pune, Maharashtra | A meeting b/w Vikram Gokhale's family & doctors took place this morning at 10am. The actor is very much alive but critical & on the ventilator. News of his demise is wrong: PRO Shirish Yadgikar, Deenanath Mangeshkar Hospital pic.twitter.com/PGNAUUYJen
— ANI (@ANI) November 24, 2022
कालपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी विनंती कुटुंबियांकडुन करण्यात आली आहे.