“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 08:20 AM2018-04-19T08:20:40+5:302018-04-19T13:53:46+5:30

सिनेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण सिनेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण रितीने करण्यासाठी, आगामी मराठी सिनेमा सायकलचे सादरकर्ते- वायकॉम18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि ...

Vintage Cycle Rally in Mumbai for promotion of "Bicycle" | “सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन

“सायकलच्या” प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन

googlenewsNext
नेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण सिनेमाचे प्रमोशन वैशिष्ट्यपूर्ण रितीने करण्यासाठी, आगामी मराठी सिनेमा सायकलचे सादरकर्ते- वायकॉम18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि शहरातील काही सेलिब्रिटीं सोबत एका व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन केले आहेरितीने करण्यासाठी, आगामी मराठी सिनेमा सायकलचे सादरकर्ते- वायकॉम18 मोशन पिक्चर्स सिनेमाच्या कलाकारांसोबत आणि शहरातील काही सेलिब्रिटीं सोबत एका व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारची रॅली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहील्यांदाच आयोजित करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सायकल दिवसाच्या संध्याकाळी या नाविन्यपूर्ण रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि यात सिनेमाचे कलाकार आणि कर्मचारी सहभागी झालेले दिसणार आहेत- जसे की प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी, प्रकाश कुंटे, त्याच बरोबर लोकप्रिय मराठी अभिनेते तेजश्री प्रधान, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, अमृता खानविलकर तसेच कलर्स मराठी परिवारातील घाडगे & सून मधील अमृता आणि अक्षय म्हणजेच भाग्यश्री लिमये आणि चिन्मय उदगीरकर, राधा प्रेम रंगी रंगली मधील राधा म्हणजेच वीणा जगताप आणि कुंकू, टिकली आणि टॅटू राज – आदिश वैद्य आणि कामिनी – श्वेता पेंडसे  आणि असेच अनेक जण उपस्थित होते. 

“सायकल” ही एक हलकीफुलकी कथा आहे ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले ? त्याला त्याची सायकल परत मिळेल का ? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपी सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली सायकल हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.

Web Title: Vintage Cycle Rally in Mumbai for promotion of "Bicycle"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.