विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' सिनेमाचे मुझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 11:02 AM2017-07-31T11:02:27+5:302017-07-31T17:28:01+5:30

पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ड्राय डे' या सिनेमाच्या नावामुळेच या चित्रपटाची ...

Vishal Bhardwaj launches 'Dury Dey' movie | विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' सिनेमाचे मुझिक लाँच

विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' सिनेमाचे मुझिक लाँच

googlenewsNext
ंडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ड्राय डे' या सिनेमाच्या नावामुळेच या चित्रपटाची अधिक चर्चा होत असून. या सिनेमाचे नुकतेच संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत म्युझिक लाँच करण्यात आले. या कार्यक्रमात हिंदीचे सुप्रसिद्ध, निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' सिनेमाच्या गाण्यांचे सादरीकरण केले गेले. संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील जय अत्रे लिखित 'अशी कशी' आणि  'दारू डिंग डांग' ही दोन गाणी म्युझिक लॉंच सोहळ्यात सादर करण्यात आली. संगीत दिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या दोन गाण्यांपैकी 'अशी कशी' हे प्रेमगीत असून, जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्याला लाभला आहे. आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर या गाण्यातून होणार आहे.शिवाय आजच्या तरूणाईवर आधारित 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील झिंग चढवणारे ठरत आहे. गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील ह्या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाददेखील लाभत आहे.मराठी चित्रपटसृष्टीतल्या या 'ड्राय डे' चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत.डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन  अमित कुमार यांनी केले आहे. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी,  मोनालिसा बागल, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Web Title: Vishal Bhardwaj launches 'Dury Dey' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.